Chitrarang

जीवन रंगाचा प्रभाव व अनुभूती

 जीवन रंगाचा प्रभाव  अनुभूती

जहांगीर आर्ट गॅलरीत जितेंद्र गायकवाड यांच्या वास्तवदर्शी कलाकृतींचे प्रदर्शन

प्रचलित कलाक्षेत्रातील सुप्रसिद्ध चित्रकार जितेंद्र गायकवाड यांच्या नवनिर्मित चित्रांचे एकल प्रदर्शन जहांगीर कलादालनमुंबई येथे दिनांक  ते १५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत भरणार आहेतेथे सर्वांना रोज सकाळी ११.०० ते संध्याकाळी .०० वाजेपर्यंत विनामूल्य बघता येईलया प्रदर्शनात त्यांनी ठेवलेली विविध चित्रे प्रामुख्याने मानवी आयुष्यात असणारे जीवनरंगाचे महत्त्व आणि त्यांचे अविस्मरणीय प्रभाव प्रकर्षाने दर्शवतात

 





ह्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन सोमवार  दिनांक  सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी  वाजता सन्माननीय प्रमुख अतिथी डॉविजय सूर्यवंशी IAS, कमिशनर राज्य महसूल महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते जहांगीर कलादालन येथे होईलत्याप्रसंगी खास अतिथी म्हणून डॉनिलेश खरे सकाळ मिडिया ग्रुप मुंबई  श्री सचिन मदाने बोर्ड ऑफ एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर वेल्थजेनिक एज्युकार्ट प्रा.लिमुंबई यांची उपस्थिती राहील.

         जितेंद्र गायकवाड यांचे बालपण पेन येथील निसर्गरम्य परिसरात गेलेअर्थात त्यामुळे त्यांच्यावर तेथील निसर्गातील विविध घटकांचा  चमत्कृतींचा वेगवेगळ्या ऋतूत होणारा दृश्यमय अविष्कार यांचा प्रभाव पडला  तशी अनुभूती त्यांना तो चित्रमय रूपात सादर करण्याची प्रेरणा मिळालीन्यू पनवेल येथील ऋषिकेश चित्रकला महाविद्यालयात त्यांचे ATD पर्यंत कलाशिक्षण झालेनंतर त्यांनी मुंबईपुणेठाणेगोवा बेंगलोर वगैरे बऱ्याच ठिकाणी आपली चित्रे एकल  सामूहिक प्रदर्शनातून नामांकित कलादालनात ठेवलीत्यांच्या प्रदर्शनांना सर्व रसिक  कलाप्रेमींचा सदैव सकारात्मक प्रतिसाद लाभला आहेअनेक ठिकाणी त्यांनी चित्रसादरीकरण करून विविध आर्टकॅम्पमधून चित्रकलेच्या प्रसारासाठी आपले योगदान दिले आहेबऱ्याच प्रवर्तक संस्थांकडून त्यांना पुरस्कार देण्यात आले असून त्यांची चित्रे अनेक नामवंत  प्रथितयश भारतीय  विदेशातील मान्यवर संग्राहकांकडे आहेत

     

प्रस्तुत प्रदर्शनात त्यांनी कॅनव्हासवर तैलरंग  ॲक्रिलिक रंग वापरून  आर्ट पेपरवर सॉफ्ट पेस्टल वापरून काढलेली विविधांगी वास्तववादी शैलीतील चित्रे मानवी जीवनात असणारे अनेक रंगांचे महत्त्व  संवेदनशील अभिव्यक्तीत्व दर्शवणारी अनुभूती अधोरेखित करतातविविध ऋतूतील निसर्गाची ती विलोभनीय रूपेभारतीय परंपरा  संस्कृती यांचे उत्कट दर्शन साकारणारी ती चित्र धार्मिक स्थळांवरील  ऐतिहासिक स्थानांवरील वैशिष्ट्येग्रामीण  नागरी जीवनाची मूल्येसामाजिक जीवनातील वैशिष्ट्ये वगैरे फार प्रकर्षाने दर्शवितातनिसर्गाच्या सानिध्यात फुलणारी मानवी मने  त्यातील वैविध्यखेळताना ग्रामीण परिसरातील मुलांची खेळकर वृत्ती  आनंददायी मानसिकताऐतिहासिक स्थळांवरील व्यक्तीदर्शन  तेथील संस्कृतीपरंपरासणसमारंभ साजरे करण्याची उत्कट वृत्तीविविध परिस्थितीतील मानवी मनोभावनांचे वास्तविक प्रकटीकरण वगैरेमुळे ती चित्रे फार मनोहर आणि चित्ताकर्षक आहेतती पुरेशी बोलकी अर्थपूर्ण असल्यामुळे सर्वांशी सुसंवाद साधतात आणि त्यांची दाद मिळवतात.

        अशा ह्या रम्य  विलोभनीय चित्रप्रदर्शनाला सर्वांचा उदंड  सकारात्मक प्रतिसाद लाभेल आणि त्यामुळे चित्रकार जितेंद्र गायकवाड यांना योग्य ती प्रेरणा  स्फूर्ती तसेच त्यांच्या उर्वरित कला प्रवासात आणखी कलात्मक अविष्कार सादर करण्यासाठी यथायोग्य प्रोत्साहन लाभेल हे निर्विवाद.


चित्रकार: जितेंद्र गायकवाड 

स्थळ: जहांगीर आर्ट गॅलरीकाळा घोडामुंबई 

कालावधी ते १५ सप्टेंबर २०२४

वेळ: सकाळी ११ ते सायंकाळी  वाजता

Post a Comment

Previous Post Next Post