चित्रकार पराग बोरसे यांना अमेरिकेचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

अमेरिकेच्या पेस्टल सोसायटीने भारतीय कलाकार पराग बोरसे यांना २०२४ सालचा बहुमोल समजला जाणारा "फ्लोरा बी गुफिनी मेमोरियल" पुरस्कार जाहीर केला आहे. २२ सप्टेंबर २०२४ रोजी मॅनहॅटन ,न्यूयॉर्क मध्ये एका आलिशान समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 

          न्यूयॉर्कमध्ये भरणाऱ्या 'एंडूरिंग ब्रिलियंनस' या नावाने प्रसिद्ध असलेल्या त्यांच्या  वार्षिक  आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे हे ५२ वें वर्ष आहे. यावर्षी अमेरिकेच्या पेस्टल सोसायटीला जगभरातून ११५५ सबमिशन प्राप्त झाली आहेत . त्यांनी समावेशासाठी केवळ १२५ कलाकृती निवडल्या आहेत. पराग बोरसे यांचे सॉफ्ट पेस्टल या माध्यमातून चितारलेले 'ए टर्बन गेझ' हे एका फेटा घातलेल्या धनगराचे व्यक्तिचित्रण आहे. पराग बोरसे यांच्या या चित्राची पुरस्काराकरिता निवड श्री. जेरेनिया विल्यम मॅककारथी (द वेस्ट मोरलॅंड म्युझियम ऑफ अमेरिकन आर्ट,ग्रीन्सबर्ग,पेन्सिल्वेनियाचे मुख्य आर्ट  क्युरेटर) या पंचांनी केली आहे. रोख एक हजार अमेरिकन डॉलर्स आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. 



              पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेची श्रीमती.फ्लोरा बी गुफिनी यांनी १९७२ मध्ये स्थापना केली.ही अमेरिकेतील सर्वात जुनी कला संस्था आहे .अमेरिकन कलाजगतामधील पेस्टल माध्यमाच्या पुनर्जागरणाचे श्रेय मुख्यत्वे याच संस्थेला जाते. न्यूयॉर्कमधील द नॅशनल आर्ट्स क्लब मध्ये भरणारे या संस्थेचे वार्षिक प्रदर्शन हे जगभरातील कलाकारांसाठी मुख्य आकर्षण असते. कलावंताची तांत्रिक कुशलता आणि सृजनशीलता हा निवड प्रक्रिये मधील प्रमुख निकष असतो. द नॅशनल आर्ट्स क्लब,१५  ग्रामर्सी पार्क, दक्षिण न्यूयॉर्क येथे ३ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर २०२४ या काळात हे प्रदर्शन कला रसिकांसाठी खुले असेल. 

            पराग बोरसे हे एकमेव भारतीय कलाकार आहेत ज्यांच्या कलाकृतीची या संस्थेने आपल्या वार्षिक प्रदर्शनासाठी चार वेळा निवड केली आहे .पराग बोरसे यांना  यापूर्वी दोन वेळा पेस्टल सोसायटी ऑफ वेस्ट कोस्ट अमेरिका यांनी पुरस्कार देऊन गौरवीत केले आहे .तसेच अमेरिकेतून प्रकाशित होणाऱ्या पेस्टल जरनल या मॅक्झिनने सुद्धा त्यांना दोन वेळा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.


Post a Comment

Previous Post More 4 Post

Art exhibitions