मुंबईस्थित आर्टिवल फॉउंडेशन द्वारा आयोजित “आर्ट कॉन्टीनम" २०२६” हे चित्र प्रदर्शन गोवा येथील कार्पे डिम आर्ट गॅलरी, ८१/२, गोदिन्हो हाऊस, कोस्टा वड्डो रोड, माजोर्डा, गोवा -४०३७१३ येथे दिनांक २८ जानेवारी ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत, सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत भरणार आहे. भारताच्या ३५ समकालीन, नामवंत कलाकारांच्या कलाकृती या प्रदर्शनात पाहण्याची सुवर्ण संधी रसिकांना उपलब्ध होणार आहे. आर्ट कॉन्टीनम २०२६ कलेचा अखंड प्रवास.. कला ही दृश्य अनुभव आहे , श्वासासारखी अखंड वाहणारी चेतना आहे. मानवाच्या आद्य गुहाभित्तींवर उमटलेल्या रेषांपासून आजच्या समकालीन अभिव्यक्तीपर्यंत कला सतत बदलत राहिली, पण तिचा मूलस्वर, मानवी अनुभूती, कधीच बदलली नाही. आर्ट कॉन्टीनम २०२६ हे प्रदर्शन त्या अखंड प्रवासाचे सजीव रूप आहे. भारताच्या विविध राज्यातून आलेले ३५ नामवंत समकालीन कलाकार आपापल्या अनुभवविश्वातून रेषा, रंग, पोत आणि अवकाश घडवतात. शहरी संवेदना आणि ग्रामीण मातीचा गंध, अमूर्त रंग ,अवकाशात आतील अनुभूती शांतपणे प्रकट होते. आकाराच्या पलीकडे जाऊन कला केवळ पाहिली जात नाही तर ती अनुभवली जाते. परंपरा आणि प्रयोगशीलता यांचा संवाद येथे घडतो. ही एकत्र आलेली कलाकृतींची मांडणी अनेक दृश्य भाषा, जीवनदृष्टी आणि अंतर्मुख प्रवाह यांचा संगम आहे.
सहभागी कलाकार :
भिवा पुणेकर, चंद्रकांत तजबीजे, दामोदर मडगावकर, दीपक गरुड, धम्मपाल किर्दक, गौतम मुखर्जी, गोपाळ परदेशी, जयदेब डोलुई, जयश्री सवानी, कप्परी किशन, मनोज दास, मारेडू रामू, मोहन नाईक, मोहित नाईक, नंदा पाठक, निलांजना रॉय, पानेरी पुणेकर, प्रदीप सरकार, पूजा अग्रवाल, राहुल किर्दक, राजू औताडे, रेश्मा शिर्के, रुचा वावरे, सतीश वावरे, सीमा हेडाऊ, शैलेश गुरव, शशिकांत पाताडे, डॉ. शेफाली भुजबळ, सिमरीत लुथरा, तानिया फतनानी, वैशाली विजय, वीरेंद्र चोपडे, विशाल फासळे, विश्वजीत नाईक इत्यादी कलाकारांचा या प्रदर्शनात सहभाग आहे. इत्यादी कलाकारांचा या प्रदर्शनात सहभाग आहे.
दिनांक : २८ जानेवारी ते ८ फेब्रुवारी २०२६
वेळ : सकाळी १० ते संध्याकाळी ७
स्थळ :
कार्पे डिम आर्ट गॅलरी,
८१/२, गोदिन्हो हाऊस,
कोस्टा वड्डो रोड,
माजोर्डा, गोवा – ४०३७१३
अधिक माहितीसाठी
कॉल / व्हॉट्सअॅप :
+91 9920804573
+91 9833949788

