Chitrarang

जहांगिर आर्ट गॅलरीत नामवंत चित्रकार प्रदीप मैत्रा यांचे जलरंगातील 'इलुजन अँड रिॲलिटी' हे चित्र प्रदर्शन

 चित्रकार प्रदीप मैत्रा 

 प्रथितयश नामवंत चित्रकार प्रदीप मैत्रा ह्यांच्या जलरंगातील 'इलुजन अँड  रिॲलिटी' हे एकल चित्र प्रदर्शन  प्रदर्शन  जहांगीर आर्ट गॅलरी  काळा घोडा, मुंबई ४००००१ येथे २९ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२४ ह्या कालावधीत भरणार आहे. ते तेथे सर्वांना रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य बघता येईल. ही चित्रे त्यांनी मुख्यतः कोविड-१९-२० ची सर्वत्र साथ पसरली असताना असणाऱ्या काहीशा नैराश्यवादी व उदास मनस्थितीत काढली असून त्या उद्विग्नावस्थेतून बाहेर येऊन चित्रनिर्मीतीद्वारा आपली निर्मितीक्षमता व गुणवत्ता वृध्दींगत  केली आहे.

जगभरातील लाखो लोकांप्रमाणे त्यांनी स्वतःही बंदिस्त वातावरणात नैराश्याशी झुंज घेतलीभिती  अनिश्चितता याने जग व्यापून टाकले असताना ते भ्रमनिरास करू लागलेत्यांच्या लायब्ररीतील पुस्तके जीवंत झाल्यासारखी वाटत होती  ती नाचत होतीएका विचित्र दिव्य सोनेरी प्रकाशाने ती प्रकाशीत होत होतीही दिव्य दृष्टी लॉकडाऊनच्या दु:स्वप्नांमध्ये विलिन झालीजिथे शाळा कॉलेज  मार्केट बंद होते.              






                    प्रस्तुत 'इलुजन अँड  रिॲलिटी- ( Illussion & Reality ) ह्या प्रदर्शनात त्यांनी मुख्यतः जलरंगातून आपल्या अनोख्या कलाशैलीचे सर्वांना दर्शन घडवले आहे. आपली सांस्कृतिक मूल्ये व आधुनिकता ह्या संकल्पनांची कलात्मक सांगड घालून त्यांच्या मनात दाटलेले नैराश्य व उद्विग्नता तसेच उदासीनता ह्यावर मात करून त्यांनी वैविध्यपूर्ण संकल्पनांवर आधारित चित्रे तयार केलीत. हे सर्व करीत असताना लायब्ररीत असणारी पुस्तकेसंदर्भ ग्रंथव त्यांचे अनिश्चित भवितव्य, सर्वत्र पसरलेले भीतीचे व निराशाजनक वातावरण आणि सर्व जनमानसात असणारी भविष्यकाळातील जीवनाविषयी संदिग्धता व तसे मनात दाटलेले काहूर अशी त्यांची मानसिक स्थिती होत. तरी पण त्यांनी यथावकाश निर्मितीप्रक्रियेत स्वतःला गुंतवले आणि त्याद्वारे आहे त्या उदासवाण्या परिस्थितीवर मात केली. त्यांच्या विविध चित्रांमध्ये पारंपारिक सांस्कृतिक मूल्ये जतन करून संवर्धन करण्याची आणि त्यात प्रसंगानुरूप आधुनिकतेची भर घालून ती चित्रसंपदा चिरकाल टिकणारी व सदैव कलात्मक करण्याची त्यांची तळमळ आढळते. त्यांच्या विविध चित्रांमधून वेगवेगळ्या प्रतिकांमार्फत त्यांनी आपली वैचारिक संकल्पना जलरंगातील चित्रसंपदेच्याद्वारे सर्वांपर्यंत पोहचविली आहे.


स्थळ: जहांगिर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई
कालावधी: २९ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२४ 
वेळ : सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या वेळेत



Post a Comment

Previous Post Next Post