Chitrarang

जहांगिर आर्ट गॅलरीत चित्रकार रामदास थोरात यांचे “प्राकृतिकता” हे एकल चित्र प्रदर्शन

 प्राकृतिकता प्राकृतिकतेचा स्पर्श

चित्रकार रामदास थोरात

सुप्रसिद्ध चित्रकार रामदास थोरात ह्यांच्या ऍक्रिलिक रंगसंगतीत कॅनव्हासवर काढलेल्या चित्रांचे एकल प्रदर्शन जहांगीर  कलादालन महात्मा गांधी मार्गकाळा घोडामुंबई ४०० ००१ येथे १७ ते २३ डिसेंबर २०२४ ह्या दरम्यान भरणार आहे. ते तेथे सर्वांना रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य बघता येईल. ह्या प्रदर्शनात ठेवण्यात येणारी चित्रे निसर्गाचा प्राकृतिक सौंदर्यपूर्ण खजिना सर्व दर्शकांपुढे सादर करतील.  

रामदास यांच्या चित्रप्रतलावरील पोत आणि रचना व अवकाशीय पोकळी, खोली, जागा प्रेक्षकांच्या दृश्य भानासाठी योगदान देतात. दृश्याचे असे काल्पनिक जग जिथे मूर्त निसर्ग आणि अमूर्तता एका विसर्गरूप दृश्यमय दृश्यप्राण महादृश्यप्राणात सूचक अश्या एका स्वराप्रमाणे विलीन होतात, आणि ते त्यांच्या चित्र-कृतीच्या कलेद्वारे दिसून येते, ती कृती भावभावना आणि संवेदना व्यक्त करण्याची क्षमता देते.  रामदास स्थूल प्रकृतिकडून अनंतसूक्ष्म प्रकृतिच्या अथांग अंतरंगात प्रवेश करू पाहतात, यांची चित्रे दृश्य अभिव्यक्तीच्या त्यांच्या सततच्या दृश्य शोधाच्या विसर्गरूपाचा दाखला आहे. जसं कठोकाठ तुडुंबभरलेल्या धरणाचे पाणी सोडणे.

प्रकृतीतील प्रकाश, अंधार, अंधुक, काळोख, उजेड, उष्णता, ऊबदारपणा, थंडावा, गारवा, शीतलता, एकांत, अग्नी, ज्वाला, जडत्व, घनत्व, विरलता, घनदाट, अरण्य, वन, रान, बाग, बगीचा, कुंड, डबक, तळ, झरा, सरोवर, नदी, नाला, समुद्र, महासागर, घर, गाव, गल्ली, शहर, किल्ले, कोपरे, बाजार इत्यादी, प्राकृतिक गुणप्रकृतीच्या दृश्य गुणरंगरूपाकाराचे सर्व वर्ण, गुणधर्म, पोत, तंत्रकृती, तंत्रजाती यांच्या गुणअगुणांच्या एकत्रित दृश्यध्वनीचा इंगित इच्छित परिणाम रामदास यांच्या चित्रकृतीतून दिसून येतो.

रामदास यांच्या चित्रप्रतलावरील पोत आणि रचना व अवकाशीय पोकळी, खोली, जागा प्रेक्षकांच्या दृश्य भानासाठी योगदान देतात. दृश्याचे असे काल्पनिक जग जिथे मूर्त निसर्ग आणि अमूर्तता एका विसर्गरूप दृश्यमय दृश्यप्राण महादृश्यप्राणात सूचक अश्या एका स्वराप्रमाणे विलीन होतात, आणि ते त्यांच्या चित्र-कृतीच्या कलेद्वारे दिसून येते, ती कृती भावभावना आणि संवेदना व्यक्त करण्याची क्षमता देते.  रामदास स्थूल प्रकृतिकडून अनंतसूक्ष्म प्रकृतिच्या अथांग अंतरंगात प्रवेश करू पाहतात, यांची चित्रे दृश्य अभिव्यक्तीच्या त्यांच्या सततच्या दृश्य शोधाच्या विसर्गरूपाचा दाखला आहे. जसं कठोकाठ तुडुंबभरलेल्या धरणाचे पाणी सोडणे. 

रामदास, यांच्या कलाकृतीमध्ये कलेसाठी असणारा अमूर्तभाव आणि मूर्तभावनानेच्या प्रतिनिधित्वाचे अद्वितीय मिश्रण दिसून येते, म्हणून निसर्गाचित्रणाची मोजपट्टी इथे वापरता येत नाही, तसेच अमूर्ताचे मूल्यही इथे तोलता येत नाही. याचा मध्य म्हणजे रंगछट, पोत, रचना आणि प्रकाशिय स्वरछटातून रजो स्वरूपाच्या दृश्याचा शोध, चित्रनोंदी स्वरूपात दर्शविला गेला आहे. 

दृश्य रचना विविध सेंद्रिय आकारांसह, तसेच सामान्य नजरेतून बागेसारखे किंवा प्रकृतिच्या अनंताच्या असीम गालिचाचे दृश्य दर्शवते. चित्रातील आडवेपणा शांतरजोत्व दर्शवते. तर आकाशाची त्वचा आणि जल, जमिनीची कातडी मातकट, राकट, चमडी त्यावरील वृक्षवल्ली, मखमली, मलमली, लव, यांच्या एकत्रित दृश्य सम-भोग परिणामामुळे, दर्शकरुपी मानवाला, मानवीय रजोगुणी रजोरुपी, अवकाशीय चैत्रिक संवेदना अनुभव, रामदास यांच्या चित्त-चित्रकृतीतून जाणवतो, तोच सम-अक्ष-क्षणासारखा दृश्य अनुभव,  चित्राचे दर्शन करताना दर्शकाला लाभतो.

Post a Comment

Previous Post Next Post