Chitrarang

आर्ट चॅलेंज आणि पुरस्कार २०२५

                               

'येलो कॅनव्हास', ही संस्था सोहन कुमार चौधरी (B.F.A., सर जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट) यांनी स्थापन केली असून, त्यांच्या वतीने ५ एप्रिल २०२५ रोजी 'आर्ट चॅलेंज आणि पुरस्कार सोहळा' आयोजित करण्यात आला. २०१६ पासून सोहन कुमार दरवर्षी 'प्रदर्शनं तसेच चॅलेंज व पुरस्कार सोहळे' आयोजित करत आहेत. या उपक्रमांचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी, त्यांची कला सादर करण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आहे.


या वर्षीचा कार्यक्रम मानव मंदिर हायस्कूल, मलबार हिल, मुंबई येथे पार पडला. या स्पर्धेमध्ये ५ वर्षांपासून ते ७५ वर्षांपर्यंत वयोगटांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमात प्रसिद्ध कलाकार, कलाशैली, व कला प्रकारांवर आधारित ज्ञानवर्धक प्रश्नमंजुषा (क्विझ) देखील आयोजित करण्यात आली होती.

कलेच्या क्षेत्रातील आणि इतर क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध व कुशल व्यक्तींचे विशेष आमंत्रण या कार्यक्रमासाठी होते.मंजू मंगल प्रभात लोढा, सूरज लेहरू, विपुला भगत, अर्पिता जिग्नेश शाह आणि अश्विन कुमार या मान्यवरांनी त्यांच्या अनुभवांची मनमोकळी वाटचाल केली आणि ललित कलेविषयी मुलांना मार्गदर्शन करून त्यांना प्रेरणा आणि उभारी दिली.





Post a Comment

Previous Post Next Post