जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये फोटोग्राफर कबीर रमेश यांचे फोटोग्राफीचे प्रदर्शन I १६ ते २२ एप्रिल २०२५ दरम्यान



 १६ एप्रिल ला दुपारी  वाजता उद्घाटक प्रागौतम गवळी (प्रो व्ही.सीॲमीटी युनिव्हर्सिटीयांच्या हस्ते होणार आहेतसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्राएस.एममायकेल (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कल्चरचे डायरेक्टरहजर राहणार आहेत

 


कबीर रमेश यांचे फोटोआर्ट कला प्रदर्शन प्रथम जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरले होतेत्यांच्या फोटोग्राफीला सुंदर प्रतिसाद मिळालाजवळजवळ हजार कलाप्रेमींनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी भेट दिली तसेच 

५०० - ६०० फोटो कला प्रेमींनी कबीर रमेश यांचे कौतुक करून पुढील फोटोग्राफीसाठी प्रोत्साहन दिले.

 

सध्याच्या प्रदर्शनात आणखीन नवीन फोटो दिसणार आहेतनेहमीप्रमाणे त्यांचे फोटो जगभराची ओळख तर करून देतातच पण त्या प्रत्येक फोटो कलाकृतीमध्ये त्यांचे वैशिष्ट्य आणि खास शैली लक्षात येतेप्रत्येक फोटो अर्थपूर्ण असतो कधी मानवता तर कधी दररोजच्या जीवनातले क्षण टिपलेले दिसतात.


 

गेल्या दोन वर्षात त्यांची फोटो कलाकृती नेहरू सेंटरला देखील झळकलीगेल्या मार्च महिन्यात बोरिवलीच्या कलादालनात त्यांचे कौतुक गायक सुदेश भोसलेकडून तसेच ताजमहल हॉटेलच्या ताज गॅलरीमध्ये पद्मश्री प्रेमजीत बारिआदिवचे कलाकार यांच्याकडून झाले

 

कबीर रमेश यांची कलाकृती पाहताना माणूस गर्क होतो तसेच क्षणभर ठरवूनही जातोएकूणच तुर्कीचेइस्तंबूललंडनजर्मनीफ्रान्सची जगप्रसिद्ध लूव्हर्स म्युझियम या ठिकाणापासून ते भारतातील मुलजीपुणेराजस्थानदिल्लीमद्रासकोलकत्ता - शांतिनिकेतन इथपर्यंत सगळ्या ठिकाणी त्यांचा कॅमेरा  कॅमेऱ्यातील एक खास शैलीदार अँगल आपले मन वेधून टाकते

 

भारतीय संविधानातून विश्वरत्न डॉबाबासाहेब आंबेडकरांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केल्यामुळेच समस्त ललित कलेचा समृद्ध वारसा कलाक्षेत्रात अविरतपणे प्रवाहित आहेउदाकोणी लोककलेतून संगीतनाट्य,चित्र,शिल्प आणि कोणी छायाचित्र कलेतून अभिव्यक्त होताना आपण पाहतोमान्य आहे कॅमेरा तांत्रिक अंगाने विकसित होत असून कॅमेरा संवेदनशील कातडीत डोकावू शकत नाहीपण संवेदनशील सुदंभ चलचित्रणचित्र तो अचूक टिपतोहे मात्र कोणाला ही नाकारणे शक्य आहे काय ?

 

चर्मचक्षुची दृष्टी जशी सर्वांना आहे तशी कॅमेऱ्यालाही आहेपण त्यापलीकडे जो ऐतिहासिकसामाजिकनैसर्गिकसौंदर्यशास्त्रीय कलामुल तत्वांना अभिजात कल्पकतेतून समय सूचकपणे क्षणाचाही विलंब  लावता समोरील दृश्यआकृती बंधाला संवेदनशील भावपूर्ण जिवंतपणा टिपतोसाकारतोअभिव्यक्त होतोतो केवळ दृष्टी आहे म्हणून नव्हे तर सर्वसमावेशक आकलनाच्या सृजनशील सौंदर्यपूर्ण दूरदृष्टीतून कॅमेऱ्यालाही संवेदनशील बनवतो तोच अभिजात छायाचित्रकाराच्या परिभाषेत बसतोयाचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर जगमान्य अभिजात छायाचित्रकार के.केमूस

 

अशाच परिभाषेतील सृजनशील नभावर स्वप्रज्ञाने प्रकाशमान होऊ पाहणारा प्रयोगशील अभिजात छायाचित्रकार आयु कबीर यांचं नाम उल्लेख करावं लागेल.

 

आयु कबीर यांना जन्मतः  प्रतिभाशाली पालकांचा वैचारिक वारसा लाभलेला असून त्यांच्या कलागुणांना उत्स्फूर्त प्रोत्साहन मिळालेले आहेम्हणूनच कबीर यांच्या छायाचित्रात भारतीय आणि पाश्चात्य ऐतिहासिक सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा पाहावयास मिळतोनकळतच कलारसिक छायाचित्र पाहताना त्या त्या काळात हरवून जातोम्हणून वाटते कोणतीही कला जात धर्म भाषा प्रांत यांची बंधन झुगारून ती कलावैश्विक होऊ पाहते

 

कल्पक दृष्टीपातळीतून दृश्याचा रचनात्मक आकृतीबंध कला रसिकांचे लक्ष वेधून घेतोकलात्मक छायाप्रकाश कधी काळया पांढऱ्या तर कधी रंगमय छटांतून छायाचित्रातील पोत अनुभवताना कला रसिकांमध्ये संवेदना निर्माण करतातत्याबरोबरच नितळ नैसर्गिक सौंदर्याची प्रचिती देतात.

 

कबीर यांच्या छायाचित्रात उत्पत्ती स्थिती लय म्हणजे तथागत बुद्धांनी जो अनित्यवाद दिलेले आहे त्याची जाणीव ही करून देतात

 

अशा सर्वस्पर्शी विचारातून परिवर्तनशीलप्रयोगशील अभिजात छायाचित्रकाराचे  त्यांच्या निर्मितीचे अभिनंदन  अनेक मंगल कामना.

Post a Comment

Previous Post More 4 Post

Art exhibitions