१० समकालीन, प्रतिथयश चित्रकारांचे "उत्सरीजी सत्संग" हे चित्र प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई येथे दिनांक ५ मे ते ११ मे २०२६ ह्या कालावधीत जहांगीर कलादालन, काळा घोडा, मुंबई येथे भरणार आहे. ते तेथे सर्वांना रोज सकाळी ११ ते ७ वाजेपर्यंत विनामूल्य बघता येईल.
या प्रदर्शनाचे उद्घाटन ५ मे २०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजता जहांगीर कलादालन, मुंबई ४००००१ येथे होईल. तेव्हा कलाक्षेत्रातील अनेक मान्यवर कलाप्रेमी, रसिकजन, संग्राहक वगैरे उपस्थित राहतील.
या प्रदर्शनात सहभागी होणारे कलाकार
पबन रॉय (झारखंड), तपन कर्माकर (कोलकाता) फुल्ल चंद्र मिस्त्री (कोलकाता), शिलादित्य बसक (उत्तर बंगाल), मलय दत्ता (कोलकाता), इंद्रजीत घोष (कोलकत्ता) रिती सुंदर रॉय (झारखंड), रणजीत जना (झारखंड)आणि मृणाल साहा (उत्तर बंगाल) इत्यादी कलाकारांचा समावेश आहे.
ह्या कलाकारांनी विविध माध्यम चित्रशैली व तंत्र यांचा कलात्मक वापर करून सादर केलेल्या कलाकृती या प्रदर्शनात ठेवण्यात येतील. भक्ती रस पूर्ण धार्मिक संकल्पना ग्रामीण जीवन, जुन्या रुढी/ परंपरा व त्यांच्या आठवणी समकालीन व आधुनिक संकल्पनांचा समन्वय व नागरी शहरी जीवनातील लोकांचा जगण्यासाठी होत असलेला संघर्ष, मानवी मनातील भावना, वेगवेगळ्या ऋतूतील निसर्गाची रूपे व त्या विलोभनीय संकल्पना रंग व पोत यांचा सुरेख संगम दर्शविणारी मिक्स मीडियामधील चित्रे विविध ऐतिहासिक वास्तू व परंपरा दर्शविणारी चित्रे आणि आधुनिक जीवनात त्यांचे महत्त्व, शहरी जीवनातील प्रदूषण आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरण होणाऱ्या परंपरा, जीवनशैली वगैरे संवादरुपी शैलीत येथे मांडण्यात येणार आहेत.
जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई
कालावधी: दिनांक ५ मे ते ११ मे २०२६
वेळ: सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत

