जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये ज्येष्ठ कलाकार जैन कमल यांचे रेट्रोस्पेक्टिव्ह कला सादरीकरण

 

 

रेट्रोस्पेक्टिव्ह प्रदर्शन - कलाकाराचा एक आध्यात्मिक प्रवास

 

प्रसिद्ध कलाकार जैन कमल यांचे रेट्रोस्पेक्टिव्ह प्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी, ऑडिटोरम हॉल, काळा घोडा, मुंबई  येथे आयोजित करण्यात आले आहे. नमोकार मंत्राच्या प्रकाशात विश्वशांतीचा शोध उलगडणाऱ्या १०१ चित्रकृतींचे हे भव्य प्रदर्शन २६ मे ते जून २०२६ या कालावधीत जहांगीर आर्ट गॅलरीच्या ऑडिटोरियम हॉल, काळा घोडा, मुंबई ४००००१ येथे भरविण्यात येत आहे. हे प्रदर्शन दररोज सकाळी ११ ते सायंकाळी या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले असेल.

 


या प्रदर्शनाचे उद्घाटन २६ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मा. दत्तात्रेय होसबलेजी (राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माननीय सरकार्यवाह) यांच्या हस्ते होणार असून, यावेळी मान्यवर कलासंग्राहक, कला रसिक,  तसेच कला प्रेमी उपस्थित राहणार आहेत

 

हे प्रदर्शन ज्येष्ठ कलाकार जैन कमल यांच्या ५१ वर्षांच्या ध्यान, चिंतन आणि सर्जनशीलतेचे सार आहे. त्यांनी साकारलेल्या अनेक नमोकार मंत्रांमधून रंग आणि आकारांच्या समर्पक संगमातून प्रखर आध्यात्मिक ऊर्जा आणि आत्मपरीक्षणाची भावना जागृत होते.




 

ज्येष्ठ कलाकार जैन कमल गेल्या ५१ वर्षांपासून प्रतीकात्मक दृश्यरूपे, प्रतिमा आणि रूपकांच्या माध्यमातून आध्यात्मिक अभिव्यक्तीची कला साधना करत आहेत. त्यांच्या कला प्रवासातून विश्वशांतीचा संदेश दृश्यरूपात अनुभवायला मिळतो. कला आणि मंत्रशक्ती यांचा प्रभावी संगम साधत त्यांनी नमोकार मंत्राला दृश्यकलेच्या नव्या अनुभवामध्ये रूपांतरित केले आहे.

 

या प्रदर्शनाचे एक महत्त्वपूर्ण आकर्षण म्हणजे ८४ लाख योनी किंवा मानवी जन्मांच्या संकल्पनेचे दृश्यरूप सादरीकरण. जैन तत्त्वज्ञानातील अनंत जीवसृष्टी आणि तिच्या प्रवासाची गूढ कल्पना त्यांनी आपल्या चित्रांमधून प्रभावीपणे मांडली आहे. हे केवळ तत्त्वज्ञानाचे चित्रण नसून जीवनशैली, त्याचा अर्थ आणि त्याच्या शाश्वततेचे आकलन करून देणारे माध्यम आहे. हे प्रदर्शन जैन जीवनातील अनेक दुर्मिळ आणि अलौकिक आध्यात्मिक रहस्ये आणि पैलू उलगडते. प्रत्येक कलाकृती विचार प्रवृत्त करते आणि प्रेक्षकाला अंतर्मुख आध्यात्मिक प्रवासाकडे प्रेरित करते. जैन कमल यांनी नमोकार मंत्राला अशा अद्वितीय दृश्यभाषेत रूपांतरित केले आहे की तो केवळ पाहिला जात नाही, तर वाचला, अनुभवला आणि अंतर्मनातील शांततेप्रमाणे जाणवला जातो.


 

या प्रदर्शनामध्येवंदे मातरम्”, “एक फकीर से दूसरा फकीरतसेच ६० राष्ट्रीय वृत्तपत्रांच्या प्रकाशन डिझाइनचाही समावेश आहे. त्यांच्या ५१ वर्षांच्या बहुआयामी कार्याचा हा व्यापक पट असून, त्यामुळे ते केवळ चित्रकार म्हणून नव्हे तर विचारवंत आणि प्रयोगशील सर्जक म्हणूनही ओळखले जातात.

हे प्रदर्शन अखेरीस एक गहन संदेश देते — “विश्वशांतीचा मार्ग अंतर्मनातील शांततेतून जातो.” कलाकार जैन कमल यांनी ही संकल्पना आपल्या कलाकृतींमधून साकार करण्याचा प्रयत्न केला आहे. मनुष्य स्वतःमध्ये शांतता आणि आनंद प्रस्थापित केल्यावरच तो जगात शांततेचा संदेशवाहक होऊ शकतो, हा विचार त्यांच्या कलेतून अधोरेखित होतो. “अरिहंत नमोआणिदिव्य शांती नमोयांसारख्या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती आत्मशिस्त, आध्यात्मिक जागृती आणि जीवनातील शांततेच्या मार्गाचा साक्षात्कार घडविणाऱ्या तत्त्वज्ञानाचे प्रभावी उदाहरण आहेत.

Post a Comment

Previous Post More 4 Post