जहांगीर आर्ट गॅलरीत धीरज हाडोळे यांचे "चित्तदर्शनी" हे कला प्रदर्शन


चित्रकार: धीरज हाडोळे

सुप्रसिद्ध समकालीन चित्रकार धीरज हाडोळे यांचे "चित्तदर्शनीहे कला प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीऑडिटोरियम हॉलकाळा घोडामुंबई येथे दिनांक २३ ते २९ डिसेंबर २०२५ या कालावधीत भरणार आहेते तिथे सकाळी ११ ते सायंकाळी  या वेळेत सर्व कलारसिकांसाठी विनामूल्य खुले राहील.

              धीरज श्रीकृष्णराव हाडोळे हे मुंबईस्थित चित्रकार असून त्यांची चित्रे समकालीन अमूर्त चित्रकलेतील शांतअंतर्मुख प्रवाहाशी नाते सांगतातरेषाआकार आणि अवकाश यांचा सूक्ष्म संवाद त्यांच्या चित्रांतून अनुभवायला मिळतोज्यामुळे ही चित्रे केवळ पाहण्याचा नव्हे तर अनुभवण्याचा अवकाश निर्माण करतात.

 




           अमरावती येथील शिवाजी चित्रकला महाविद्यालयातून त्यांनी A.T.D., सर जे.जेस्कूल ऑफ आर्ट्समुंबई येथून B.F.A. (पेंटिंग A.T.C. (फोटोग्राफीतसेच मुंबई विद्यापीठातून M.A. (पुरातत्त्वपूर्ण केले आहेचित्रकलाफोटोग्राफी आणि ऐतिहासिक स्मारकांचा अभ्यास हे त्यांच्या कार्याचे प्रमुख क्षेत्र असून त्यांनी देश-विदेशातील अनेक महत्त्वाच्या कला प्रदर्शनांत सहभाग घेतला आहेविविध पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या हाडोळे सध्या डोंबिवली (मुंबईयेथे कार्यरत आहेत.

 

धीरज हाडोळे यांची चित्रे त्या समकालीन अमूर्त प्रवाहाशी संवाद साधतातजिथे रचनाअवकाश आणि शांतता यांना स्वतंत्र अभिव्यक्ती प्राप्त होतेत्यांच्या चित्रांत रंगांचा आवाका मर्यादित असलातरी त्यातून एक खोलस्थिर अवकाश हळूहळू उलगडत जातोत्रिकोणी आणि सममित आकार श्वासासारखे एकमेकांत मिसळत चित्राला ध्यानात्मक लय देतात.

          चित्राच्या केंद्राकडे झुकणारे पृष्ठभाग प्रकाश आणि छायांच्या सूक्ष्म बदलांतून अदृश्य खोली निर्माण करतातही चित्रे पाहताना नजर थांबतेपाहणे थांबते आणि अनुभव सुरू होतोज्या क्षणी बाहेरचे जग मंदावतेत्या क्षणी हे चित्र आत बोलू लागतेवासिली कँडिन्स्की यांनी म्हटल्याप्रमाणेचित्र हे डोळ्यांसाठी नसून आत्म्यासाठी असतेहा विचार इथे शब्दांशिवाय प्रकट होतोदृश्य घटक महत्त्वाचे असलेतरी त्याहून अधिक महत्त्वाची ठरते ती अंतःप्रेरणा.

 

        धीरज हाडोळे यांच्या चित्रांत सपाट कॅनव्हास हळूहळू अवकाशात रूपांतरित होत जातोस्तरांवर उभारलेले आकारशिवलेल्या पृष्ठभागांची संवेदनशील रचना आणि छाया प्रकाशांचे सूक्ष्म नाते यांमुळे चित्रात स्पष्ट त्रिमितीय परिणाम निर्माण होतोआकार कॅनव्हासवर स्थिर  राहता पुढे येतातमागे सरकतात आणि पाहणाऱ्याभोवती एक शांत अवकाश तयार करतात.

         या चित्रांत त्रिमिती ही  दृश्य परिणाम  अनुभव बनतेप्रत्येक स्तरप्रत्येक कडा आणि प्रत्येक रंगछटा अवकाशाची जाणीव अधिक गडद करतेत्यामुळे चित्र पाहणे हा क्षण  राहतात्या अवकाशात प्रवेश करण्याची प्रक्रिया ठरतेजिथे कॅनव्हास अनुभवाचा विस्तार बनतो.

 

        काही चित्रांत ही लय अधिक स्पष्टपणे जाणवतेमध्यभागी संतुलन असून दोन्ही बाजूंना सूक्ष्म हालचालींची चाहूल लागतेपृष्ठभागावरील टेक्सचर स्थिर विचारांसारखे भासतातजणू रेषांचा एक स्मरणप्रवासचित्रातील अवकाश यांचा परस्पर संवाद चित्राला दृश्य तसेच एक अंतर्मुख अनुभव बनवतो.

 

        अखेर ही चित्रे पाहणाऱ्याला थांबायला शिकवतातविचारांच्या गडबडीतून बाहेर काढूनआतल्या शांततेकडे नेणारा हा प्रवास आहेम्हणूनच धीरज हाडोळे यांची चित्रे समकालीन अमूर्त चित्रकलेचा भाग असतानाचपाहणाऱ्याच्या अंतर्मनात उमटणारा एक मौन संवाद ठरतातजिथे अर्थ हळूहळू अनुभवातून उलगडत जातो.

Post a Comment

Previous Post More 4 Post

Art exhibitions