![]() |
| चित्रकर्ती : दीप्ती जे. शाह |
सुप्रसिद्ध समकालीन कलाकार दीप्ती जे. शाह यांचा “वूमन्स व्हॉईस इन सायलन्स” हा एकल प्रदर्शन सध्या मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये सुरु आहे. हे प्रदर्शन २९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. आर्टझी’ज स्टुडिओच्या संस्थापक असलेल्या दीप्ती शाह लहानपणापासून श्रवणशक्तीहीन आहेत, परंतु चित्रकलेतून त्यांनी स्वतःचा अभिव्यक्तीचा सर्वात गहन मार्ग शोधला. मागील दोन दशकांत त्यांनी ५० हून अधिक वॉल पेंटिंग्स साकारली असून, ए अँड आय मॅगझिनचा बेस्ट इंटिरिअर अवॉर्ड (२००४) प्राप्त केला आहे तसेच २०१० मध्ये गुरु तनुल विकमशी यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च प्रशिक्षणासाठी एसपीआयसी मॅके शिष्यवृत्ती मिळवली आहे. त्यांच्या कलाकृती भारतासह अमेरिका, दुबई आणि युकेमध्ये प्रदर्शित झाल्या आहेत.
दीप्तींच्या कलाकृतींमध्ये त्यांचा विश्वास प्रतिबिंबित होतो – “सायलन्स म्हणजे पोकळी नाही, ती रंगांची, हालचालींची आणि आठवणींची भाषा आहे.” त्यांच्या भित्तिचित्रांमध्ये आणि कॅनव्हासवर रंगांच्या साहाय्याने स्त्रियांची जिद्द, दैनंदिन जीवनातील विधी आणि समुदायाची शांत शक्ती उमटते.
सध्या सुरु असलेले हे प्रदर्शन प्रेक्षकांना भित्तिचित्रांपासून अंतरंग कॅनव्हासपर्यंत एक प्रवास घडवते, ज्यामध्ये नजरेतून ऐकणे, थांबून पाहणे आणि शांततेचे सामर्थ्य अनुभवणे शक्य होते. “वूमन्स व्हॉईस इन सायलन्स” हे प्रदर्शन दीप्ती शाह यांच्या अप्रतिम अभिव्यक्तीचे दर्शन घडवते आणि रंगांमधून निःशब्द भाषेचा प्रभावी अनुभव देतं.

.jpeg)
