![]() |
चित्रकार: संतोष कुमार शांडिल्य |
सुप्रसिद्ध गंगाजल चित्रकार संतोषकुमार शांडिल्य यांच्या नवनिर्मित चित्रांचे एकल चित्रप्रदर्शन कमल नयन बजाज आर्ट गॅलरी , बजाज भवन, नरिमन पॉइंट, मुंबई - ४०००२१ येथे २७ एप्रिल ते ३ मे २०२६ ह्या दरम्यान भरणार आहे. ते तेथे सर्वांना रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य बघता येईल. ह्या प्रदर्शनाचे उद्घाटन २७ एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी ५. ३० वाजता कमलनयन बजाज कलादालनात होईल. त्यावेळी येथे अनेक मान्यवर कलाप्रेमी, रसिक व कलासंग्राहक उपस्थित राहतील. ह्या प्रदर्शनात त्यांनी तैलरंग वापरून कॅनव्हासवर काढलेली चित्रे ठेवण्यात येतील. संतोषकुमार शांडिल्य हे सुविख्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'गंगाजल चित्रकार' म्हणून प्रसिद्ध आहेत.
ह्या प्रदर्शनात त्यांनी गंगाजल वापरून काढलेली वाराणसी येथील विविध घाट, देवळे, प्रवाही नद्या, बोटी, मंदिरात होणाऱ्या आरत्या, घाटावरील धार्मिक वातावरण आणि भगवान शंकराचे अस्तित्व दर्शविणाऱ्या विविध संकल्पना वगैरे कलात्मकतेने दाखविल्या आहेत. त्यात मुख्यतः निसर्गचित्रे वाराणसी येथील अनेक घाट आणि त्यावर होणाऱ्या पूजा अर्चा, धार्मिक वातावरण वगैरेचे उत्कट दर्शन सर्वांना घडविले आहे. योग्य रंगसंगती लाईट व शेड परिणाम वगैरे वापरून कलाकाराने आपल्या चित्रमाध्यमातून सर्वांना वाराणसी येथील धार्मिक वातावरणाचे दर्शन घडवले आहे.
चित्रकार: संतोष कुमार शांडिल्य
कमल नयन बजाज आर्ट गॅलरी , बजाज
२७ एप्रिल ते ३ मे २०२६ ह्या दर
सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजे


