![]() |
| चित्रकर्ती: अंजली प्रभाकर |
मुंबई येथील प्रसिद्ध काला घोडा परिसरातील जहांगीर कला दालन, काळा घोडा, मुंबई येथे दिनांक ३१ ऑगस्ट ते ०६ सप्टेंबर २०२६ दरम्यान सुप्रसिद्ध समकालीन चित्रकर्ती अंजली प्रभाकर यांच्या चित्रांचे 'प्रवाह' या मालिकेतील कलाकृती मांडण्यात येणार आहेत. हे प्रदर्शन रोज सकाळी ११:०० ते सायंकाळी ७:०० या वेळेत कलारसिकांसाठी विनामूल्य खुले राहील.
अंजली प्रभाकर यांची चित्रकला ही मानवी चेतना व अनंत विश्व यांच्यातील सूक्ष्म संवादाचे चित्रीकरण आहे. दृष्य जगाच्या पलीकडेही एक अदृष्य भावविश्व आहे व त्या भावविश्वाच्या प्रखर अनुभूतीसाठी उर्जा, मौन, कंपन व चेतना यांच्या सहाय्याने अंजली या भावनीक अनुनादाच्या प्रवाहात येतात. त्यांच्या भावविश्वातील प्रवाह अनंत विश्वात सामिल होऊन परमानंदाचा शोध घेतो. भौतिक जगाच्या दृष्टीपलीकडेही बऱ्याच गोष्टी आहेत. मन व अत्म्यालाच त्या स्पंदनाच्या स्वरूपात जाणवतात. याच स्पंदनांचा प्रवाह चित्रित करण्याचा प्रामाणिक व यशस्वी प्रयत्न अंजली प्रभाकर यांनी त्यांच्या चित्रणात केला आहे. त्यांच्या कलाकृतीत जाणवणारे मौन हे शांत किंवा सूप्त नसून ते अनंत स्पंदनाच्या संयमाने खोलवर दाटलेले आहे. चित्रात जाणवणाऱ्या प्रकाशाचे फटकारे हे अंतर्मनातील भावनीक जागृतीचे प्रतिक आहे. त्यांनी निसर्गातील बाहय व दृश्य पोत न रंगवता अंतर्मनातील भावनीक रंग, पोत व प्रकाश आपल्या चित्रात चित्रित केला आहे. या प्रक्रियेतून एक प्रचंड उर्जेचा सचेतन प्रवाह निर्माण होतो व याचे सूक्ष्म अनंत तरंग प्रेक्षकाला स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पाहण्यास प्रवृत्त करतात आणि आपण या विश्वाच्या परिपूर्णतेचाच एक अविभाज्य भाग आहोत या मूलभूत सत्याची आठवण करुण देतात. अंजली यांच्या चित्राचे माध्यम हे कॅनव्हासवरती ॲक्रिलिक रंग हे आहे. चित्र नुसत्या डोळ्यांनीच पाहायची नसून ती स्पंदनांनी अनुभवायची सुंदर प्रक्रिया आहे हे प्रदर्शन म्हणजे मानवी भावना व अंतराळ यांच्या एकमेकांत गुंफलेल्या अदृष्य धाग्यांचा जिव्हाळ्याचाच एक प्रवाह आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन 31 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 4.30 वाजता माननीय प्रमुख अतिथी श्रीमती निधी चौधरी, IAS, संचालक – NGMA, मुंबई यांच्या हस्ते होणार आहे.
विशेष अतिथी:
डॉ. किशोर इंगळे, संचालक, कला संचालनालय, महाराष्ट्र
सन्माननीय अतिथी:
• प्रा. हिम कुमार चॅटर्जी, कुलगुरू, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाइन, मुंबई
• श्री. प्रयाग शुक्ला , कला समीक्षक, कवी, फिक्शन लेखक व क्युरेटर
• श्री. राजेंद्र पाटील, अध्यक्ष – द बॉम्बे आर्ट सोसायटी, संचालक – इंडिया आर्ट फेस्टिव्हल
• श्रीमती के. जी. मेनन, सचिव, जहांगीर आर्ट गॅलरी
• श्री. प्रवीण उपाध्ये, कलाकार, संस्थापक-संचालक, गॅलरी पायोनियर, नवी दिल्ली
नुरील भोसले



